• अभिराम भडकमकर लिखित 'सीता' (नमुना: प्रकरण १)
    May 13 2026

    'सीतामाते, एक खचलेली, दीनवाणी अबला भेटेल, अशा भ्रमात मी होतो. मला भेटली एक कणखर करारी स्त्री!' ही हनुमंताला दिसलेली सीता... आणि लक्ष्मण मूर्च्छित पडल्यावर - या साऱ्या महायुद्धाला आपला सुवर्णमृगाचा मोह कारणीभूत ठरला, असं वाटून 'पार्वतीमाते, एक वेळ मला श्रीरामाच्या आयुष्यातून वजा कर, पण लक्ष्मणाचे प्राण वाचव...' असा विलाप करणारी सीता... खरंच, कशी होती सीता? विचारी आणि खंबीर? की हतबल आणि भावुक? नियतीची बळी ही सीतेबद्दलची धारणा खरी, की रामरक्षेतलं तिचं 'सीताशक्ति:' हे रूप खरं? महर्षी वाल्मिकींनी चितारलेल्या सीतेच्या विविध प्रतिमांचा समृद्ध वेध घेणारी सुप्रसिद्ध लेखक अभिराम भडकमकर यांची कादंबरी सीता, ऐका अनुपमा ताकमोगेच्या भावनापूर्ण आवाजात फक्त स्टोरीटेल ऍपवर.

    Show More Show Less
    24 mins
  • Detective Alpha ani madhya Ratriche Sangeet Saurabh wagle (sample) डिटेक्टिव्ह अल्फा आणि मध्यरात्रीचे संगीत सौरभ वागळे (झलक)
    May 6 2026

    नाशिक जिल्ह्यामध्ये काडवा नदीकाठी कुंदेवाडी नावाचं एक शांत- सुंदर खेडेगाव आहे. या गावाच्या बाहेर शेतांनी वेढलेल्या परिसरात सुप्रसिद्ध सतारवादक नानासाहेब रानडे यांचा बंगला आहे. चौऱ्याऐंशी वर्षांचे नाना आजही बंगल्याच्या आवारात खास बनवलेल्या आउटहाउसमध्ये नियमित सतारवादन करतात. या नियमाला अचानक एक अनपेक्षित वळण मिळतं. हिवाळ्यातील एका थंड रात्री त्या आउटहाउसमधून एकाएकी सतारीचे सूर ऐकू यायला लागतात आणि समस्त रानडे कुटूंबीयांची झोप उडते. ते आउटहाउससचा दरवाजा उघडून पाहतात आणि त्यांना समोर रक्त गोठवून टाकणारं दृश्य दिसतं - खोलीच्या मध्यभागी सतारीला कवटाळून निपचित पडलेला नानांचा मृतदेह! नानांचा खून झाला, हे सिद्ध झालं आहे. आणि अल्फाला शोधून काढायचंय, ते निर्दयपणे, थंड डोक्याने खून करणाऱ्या त्या गुन्हेगाराला. कोण असेल नानांचा खुनी? त्यांच्या कुटुंबातलाच कोणीतरी? की नानांचा एखादा अज्ञात शत्रू? संशयितांच्या गर्दीत आणखी एक प्रश्न विकट हास्य करत अल्फासमोर उभा आहे, आणि तो म्हणजे, नानांच्या मृत्यूसमयी वाजलेल्या सतारीचं रहस्य नक्की काय आहे? ऐका सौरभ वागळे लिखित 'डिटेक्टिव्ह अल्फा आणि मध्यरात्रीचे संगीत'चे एक प्रकरण मोफत कृणाल आळवेच्या दमदार आवाजातआणि पूर्ण कथा ऐकण्यासाठी स्टोरीटेल appला सबस्क्राईब करा.

    Show More Show Less
    33 mins
  • Umbarkhind - Nitin Thorat उंबरखिंड - नितीन थोरात
    Apr 30 2026

    इतिहासातील सर्वात मोठा गनिमी कावा

    शिवशाहीचा धुराळा करण्याच्या बेताने शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला. हत्तीघोडे, हत्यार, सोनंनाणं, खजाना , लढवय्ये योद्धे साऱ्या प्रबळ ताकदीने शाहिस्तेखानाने स्वराज्याला अजगरी वेढा घातला. या शाहिस्तेखानाला धडा शिकवायचा असेल तर आधी त्याचा उजवा हात मुळासकट उखडून टाकायला हवा, या विचाराने शिवाजीराजांनीं रचला सर्वात भयाण गनिमी कावा. मुघली इतिहासातील तो कला दिवस. एक हजार मराठ्यांनी तीस हजार मुघलांना उंबरखिंडीत चारी बाजूंनी वेढा घालून निबर फोडले. तेच हे युद्ध, त्याच डावाची ही कथा. माती गुंग करणारा गनिमी कावा.

    पहिला एपिसोड आवडला तर पूर्ण पुस्तक स्टोरीटेल वर किव्हा इतर ऑडिओ अँप वर जरूर ऐका. https://www.storytel.com/in/books/umbarkhind-12255718

    Show More Show Less
    46 mins