Storyside Marathi - First Chapter cover art

Storyside Marathi - First Chapter

Storyside Marathi - First Chapter

By: Storyside India
Listen for free

Summary

तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात? 'स्टोरीसाइड मराठी: फर्स्ट चॅप्टर्स' मध्ये तुमचे स्वागत आहे! 🎧 येथे तुम्हाला मिळतील मराठीतील सर्वोत्तम ऑडिओबुक्सचे पहिले भाग अगदी मोफत. अजरामर साहित्यापासून ते थरारक क्राईम थ्रिलर्स, प्रेरणादायी चरित्रे आणि आजच्या काळातील बेस्ट-सेलर्सपर्यंत - साहित्याचा हा खजिना आता तुमच्या कानात! प्रत्येक एपिसोडमध्ये एका नव्या कथेची झलक अनुभवा. जर तुम्हाला पुढची गोष्ट ऐकायची असेल, तर आजच 'Storytel' ॲप डाउनलोड करा आणि हजारो मराठी ऑडिओबुक्सचा आनंद घ्या. Love a good story? Welcome to Storyside Marathi: First Chapters! 🎧 Get a front-row seat to the best of Marathi literature in audio. From the timeless classics to gripping crime thrillers, inspiring biographies, and modern-day bestsellers—experience the magic of storytelling on the go. In this podcast, we bring you the exclusive first chapters of our top-rated Marathi audiobooks for free. 👉 Hooked on a story? Don't stop now! Download the Storytel app to listen to the full versions of these titles and explore our massive library of Marathi audio content.@storysideindia
Episodes
  • Detective Alpha ani madhya Ratriche Sangeet Saurabh wagle (sample) डिटेक्टिव्ह अल्फा आणि मध्यरात्रीचे संगीत सौरभ वागळे (झलक)
    May 6 2026

    नाशिक जिल्ह्यामध्ये काडवा नदीकाठी कुंदेवाडी नावाचं एक शांत- सुंदर खेडेगाव आहे. या गावाच्या बाहेर शेतांनी वेढलेल्या परिसरात सुप्रसिद्ध सतारवादक नानासाहेब रानडे यांचा बंगला आहे. चौऱ्याऐंशी वर्षांचे नाना आजही बंगल्याच्या आवारात खास बनवलेल्या आउटहाउसमध्ये नियमित सतारवादन करतात. या नियमाला अचानक एक अनपेक्षित वळण मिळतं. हिवाळ्यातील एका थंड रात्री त्या आउटहाउसमधून एकाएकी सतारीचे सूर ऐकू यायला लागतात आणि समस्त रानडे कुटूंबीयांची झोप उडते. ते आउटहाउससचा दरवाजा उघडून पाहतात आणि त्यांना समोर रक्त गोठवून टाकणारं दृश्य दिसतं - खोलीच्या मध्यभागी सतारीला कवटाळून निपचित पडलेला नानांचा मृतदेह! नानांचा खून झाला, हे सिद्ध झालं आहे. आणि अल्फाला शोधून काढायचंय, ते निर्दयपणे, थंड डोक्याने खून करणाऱ्या त्या गुन्हेगाराला. कोण असेल नानांचा खुनी? त्यांच्या कुटुंबातलाच कोणीतरी? की नानांचा एखादा अज्ञात शत्रू? संशयितांच्या गर्दीत आणखी एक प्रश्न विकट हास्य करत अल्फासमोर उभा आहे, आणि तो म्हणजे, नानांच्या मृत्यूसमयी वाजलेल्या सतारीचं रहस्य नक्की काय आहे? ऐका सौरभ वागळे लिखित 'डिटेक्टिव्ह अल्फा आणि मध्यरात्रीचे संगीत'चे एक प्रकरण मोफत कृणाल आळवेच्या दमदार आवाजातआणि पूर्ण कथा ऐकण्यासाठी स्टोरीटेल appला सबस्क्राईब करा.

    Show More Show Less
    33 mins
  • Umbarkhind - Nitin Thorat उंबरखिंड - नितीन थोरात
    Apr 30 2026

    इतिहासातील सर्वात मोठा गनिमी कावा

    शिवशाहीचा धुराळा करण्याच्या बेताने शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला. हत्तीघोडे, हत्यार, सोनंनाणं, खजाना , लढवय्ये योद्धे साऱ्या प्रबळ ताकदीने शाहिस्तेखानाने स्वराज्याला अजगरी वेढा घातला. या शाहिस्तेखानाला धडा शिकवायचा असेल तर आधी त्याचा उजवा हात मुळासकट उखडून टाकायला हवा, या विचाराने शिवाजीराजांनीं रचला सर्वात भयाण गनिमी कावा. मुघली इतिहासातील तो कला दिवस. एक हजार मराठ्यांनी तीस हजार मुघलांना उंबरखिंडीत चारी बाजूंनी वेढा घालून निबर फोडले. तेच हे युद्ध, त्याच डावाची ही कथा. माती गुंग करणारा गनिमी कावा.

    पहिला एपिसोड आवडला तर पूर्ण पुस्तक स्टोरीटेल वर किव्हा इतर ऑडिओ अँप वर जरूर ऐका. https://www.storytel.com/in/books/umbarkhind-12255718

    Show More Show Less
    46 mins
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet